आपण आपला आनंद दुसऱ्यांमध्ये का म्हणून आणि किती दिवस शोधत राहायचा? सगळं माहिती असतं डोक्याला, मनाला, बुद्धीला तरी सुद्धा आपण उगाच भावनांच्या खेळात अडकतो. मी इतके दिवस तुझ्याशी नीट वागले, तुझं सगळं म्हणणं ऐकून घेतलं म्हणून तू सुद्धा माझ्यासोबत नीट वागलास. आता तुझ्या मनाप्रमाणे हव्या तशा गोष्टी घडत नाही म्हणून तू रुसवे- फुगवे करायला लागला आहेस! तिच्याशी मी तुझ्यासाठी बोलत नाही हा तुझा आरोप. इतक्या नानाविध पद्धतीने तुला समजावण्याचा प्रयत्न केला मी गेली दोन-अडीच वर्षे, पण सर्व उथळ पाण्यात वाहून गेलं. आता तिच्याशी मी बोलायला तयार नाही आणि ती तुझ्याशी, तर तू माझ्यासोबत बोलणं टाकलंस. ठीक आहे. तुझ्या येण्याआधी सुद्धा मी जगत होते आणि खूप चांगल्या पद्धतीने, उत्तम आरोग्यात होते. तुझ्या नसण्याने माझ्या आयुष्यात थोडे दिवस एखादी पोकळी निर्माण होईल पण ती भरून देखील जाईल. मी उगाच तुझ्या जाण्याने कोलमडून जाईन असं तुला वाटत असेल तर अजिबात नाही. एवढा अधिकार नाही दिला मी तुला माझ्या आयुष्यात, किंबहुना तो कुणालाच नाही आणि कधी देणार सुद्धा नाही. खूप रडले मी तुझ्यासोबत असताना आणि आता तर मला फक्त त्या...
"Some of the sweetest things in life are through greatest struggling battles"