Skip to main content

Posts

Showing posts with the label the song of life

मनात माझ्या....

आज रविवार. सकाळी गच्चीवर फिरताना सभोवताली नजर फिरवली आणि गेल्या कित्येक वर्षात ह्या परिसरात रहात असताना झालेल्या बदलांचा मी मागोवा घेतला. पूर्वी सगळीकडे इथे घनदाट झाडांच्या रांगा होत्या, रस्त्याच्या दुतर्फा आणि पार डोंगरापर्यंत. मग हळूहळू मानवी वस्ती वाढायला सुरुवात झाली. आधी छोटी तुरळक घरं दिसायला लागलीत मग तीन मजली इमारती आणि आता तर टोलेजंग दहा ते पंधरा मजली गगनचुंबी इमारती. जणू आकाशाला गवसणी घालण्याकरिता त्यांच्या सगळ्यांमध्ये चढाओढ निर्माण झाली. मला आता दिसताय त्या दूर क्षितिजावर धुरकट पण तरी डौलदार अशा डोंगर रांगा. लांबून त्यांच्या स्थिर दिसणाऱ्या रेघा पाहिल्यावर एखाद्या कुंचल्याने आकाशाच्या पटलावर किती अलगद सहज रंग उमटले असा भास माझ्या मनाला स्पर्शून गेला.   वारा देखील मनातल्या आठवणींना पिंगा घालत होता. मला आठवला पावसाळ्यातला तो दिवस जेव्हा आम्ही पहिल्यांदा या नवीन घरी पाऊल टाकलं होतं. नुकत्याच सरी येऊन गेल्या होत्या आणि सगळा आसमंत मातीच्या घमघमाटात प्रसन्न भरला होता. झाडांवर पावसाचा शिडकावा इतका आल्हाददायी भासला होता. पूर्वी कधीच इतकं जवळून निसर्गाशी एकरूप होण्याची संधी...