कॅशिअस क्ले अर्थात मुहम्मद अली. लहान असतांना वडिलांनी ज्या व्यक्तींबद्दल अगदी भरभरून मला कहाण्या ऐकवल्या त्यात मुहम्मद अली फार वरच्या क्रमांकावर. वर्णभेद चळवळ आणि संघर्षाबद्दल मला खूप लहानपणीच वडिलांकडून बरंच काही ऐकायला मिळालं. जातिव्यवस्थेबद्दल जसं तसंच नेल्सन मंडेला तथा माल्कम एक्स यांच्याबद्दल, त्यांनी सुरु केलेल्या चळवळी, त्यांचा मानवी समानतेसाठी प्रदीर्घ लढा, सारं काही खूप लहान वयापासूनच ऐकत आले वडिलांकडून. काल मुहम्मद अली यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यावर वाटलं आपण ह्या सर्व जगज्जेत्यांना अमर समजत रहातो. त्यांची कीर्ती अजरामर असतेच पण ते स्वतः देखील, अशी भावना कुठेतरी खोल दडलेली असते आपल्यात. मला आठवतं जेव्हा मुहम्मद अलींच्या मुलीने, लैला अली हिने जागतिक मुष्टीयोद्धा स्पर्धा जिंकली होती, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया एक अत्यंत अभिमानी वडील या भूमिकेतून टीव्ही वर मी ऐकली होती. ते बघून आपण सुद्धा आपल्या वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवण्याचा उत्साह माझ्यात संचारला होता. ते चेहऱ्यावरून मला कधीच एक मुष्टीयोद्धा वाटले नाहीत. एखाद्या मुष्टीयोद्ध्याची रागीट मुद्रा किंवा...
"Some of the sweetest things in life are through greatest struggling battles"