Skip to main content

Posts

Showing posts with the label price tag

मनात माझ्या

(Artwork by Jonathan Kwegyir Aggrey) रविवारी वर्तमानपत्रात 'इस्तंबुलचा सुगंध' म्हणून एक लेख वाचला. त्यातली छायाचित्रं पाहून मला ओरहान पामुक यांच्या 'इस्तंबूल' या पुस्तकाची प्रकर्षाने आठवण झाली. आणि वाचता वाचता माझा कुठल्यातरी गोष्टीवरून बहिणीशी खटका उडाला, हे लिहिताना माझा हात किती कापरा झालाय. सर्वांची दृष्टी निराळी हे मान्य पण एखाद्या गोष्टीवर एवढी टोकाची भूमिका का असावी? आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी ऐकून घेण्यात काय वाईट आहे? किंबहुना हा समजूतदारपणा दाखविण्याचा थोडा प्रयत्न तरी आपण करू नये का? बघता बघता नवीन वर्षाचा पहिला महिना संपला सुद्धा. वाचायला तर खूप काही घेतलय, लिहायला देखील, ते कागदावर मांडायला हवं तेवढं वेळेवर. बऱ्याचदा गोष्टी मनातच राहून जातात, त्या सांगितल्या जात नाहीत, मग त्यांची घुसमट होते, त्या तिथेच दबल्या जातात. एखाद्या नॉस्टाल्जिक संध्याकाळी मग त्या आपल्याला आठवतात. त्यावर आपण मनातल्या मनात तेव्हाही उहापोह करतो पण त्या व्यक्त होतच नाही. ही आठवण मग कितीतरी वर्ष आपल्याला सतवत राहते. आणि कधीतरी मग अशी कागदावर उतरते. सांगायचच झालं तर पामु...