एखादया सुंदर संध्याकाळी आपल्या जिवलग मैत्रिणीला भेटावं आणि सांगीतिक मैफिलीत रममाण होऊन निघावं आणि त्या आठवणींना सुंदर दुजोरा देत परत एकत्र घरी जाणं, यात अवर्णनीय आनंद आहे. मी तो कालच अनुभवला. मोकळ्या आकाशाखाली गारवा असलेल्या भव्य मैदानावर स्टेज समोर बसून शास्त्रीय नृत्याची मेजवानी आणि तितकंच उस्फुर्त असं वातावरण फारच छान अनुभूती देऊन गेला. सुरुवात शाळकरी मुलींच्या अतिशय लयबद्ध लेझीम नृत्याने झाली. आम्हा दोघींच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यातच ओळखीचे असे वाटणारे बरेच चेहरे डोळ्यासमोरून तरळून गेले. अवतीभवती असणारा लोकांचा सळसळता उत्साह आमच्यात देखील परावर्तित होत होता. ते तीन तास खूप आनंददायी क्षण देऊन गेले. मैत्रिणीला बऱ्याच दिवसात भेटले नव्हते. ती भेट झाली आणि पुस्तकांवर मनसोक्त चर्चा केली. रोजच्या धावपळीच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी राहून जातात. आम्ही एकमेकींना कितीही व्यस्त असलो तरी आठवणीने आवडलेलं शेअर करतो. कधीतरी बोलणं होत नाही, पण ती नाळ घट्ट जोडलेली असल्यामुळे विशेष असा काही आमच्या वागण्या- बोलण्यात फरक पडत नाहीच. हीच तर जीवच्च - कंठच्च मैत्रीची खूण. अशा कित्येक ओळखींना...
"Some of the sweetest things in life are through greatest struggling battles"