मला उगाचच पटकन मनाला लावून घ्यायची सवय झालीय. फार लवकर वाईट वाटून घेते मी. यात तोटा माझाच होतो शेवटी. प्रचंड मानसिक तणाव राहतो मनावर बरेच दिवस, कधी कधी आठवडे देखील. मागच्या वर्षी तर खूप महिने प्रचंड दडपण आलं होतं मला. अभ्यासात देखील मग मन रमत नव्हतं. त्यामुळे एक फायदा असा झाला कि इथे मी ब्लॉग मात्र नियमितपणे करायला शिकले तेवढ्या अवधीत. आज घरातला पुस्तकांचा आणि वर्तमानपत्रांचा पसारा आवरताना मला बरीचशी जुनी कात्रणं सापडली. मी पार हरखून गेले सगळंच अधाशीपणे वाचण्याच्या नादात. लोकसत्ताच्या लोकरंग तसेच चतुरंग पुरवण्यांमधले अगणित लेख, टिपणं, आणि संग्रही केलेले भरमसाठ विशेष पुरवण्यांचे गठ्ठे! माझी आई नेहमीप्रमाणे मला ओरडली कि सगळं टाकून दे, गरजेपुरतच आता संग्रह आवरता घे. तेवढ्यात माझे डॅडी घरी आले आणि मी काढलेल्या मासिकांच्या गट्ठ्यांना ढूंढाळू लागले. मग काय आम्ही दोघं त्यात गर्क झालो तासभर. शेवटी हो नाही म्हणता म्हणता परत मोठा ढीग झालाच परत. मग जेवणानंतर मी मला वाचावेसे वाटणारे कात्रणं नि पुरवण्या हाताशी धरल्या आणि गुंगून गेले सगळ्यात. खरंच! आपण आयुष्यात किती गोष्टींचा संग्रह करतो. कधी आनंद...
"Some of the sweetest things in life are through greatest struggling battles"