आज मी बऱ्याच दिवसांनी ट्रेनचा प्रवास केला. तसा नेहमीच करते, पण आज पुस्तक वाचता- वाचता गर्दी कमी असल्याकारणाने बाहेर खिडकीतून बघायला मिळालं. काही विचार डोक्यात आले. जिथे उतरले तिथून ज्या रस्त्यावर पायपीट करायला सुरुवात केली तिथे ताम्रशिंबी अर्थात कॉपर पॉड ची ओळीने लावलेली असंख्य झाडं रस्ताभर मला साथ करत होती. पिवळ्या रंगाची अशी उधळून पाहून मन प्रसन्न झालं. मला उगाच त्या रस्त्यावरून परत येता जाता फिरायला आवडेल असं वाटून गेलं. मी मुंबईतल्या फोर्ट भागातल्या छोट्या रस्त्यांवर अशीच फिरते. एकटीने चालायला मला फार आवडतं. डोक्यात असंख्य विषय असतात, त्यांच्याशी एक द्वंद सतत चालू असतं. चेहरा निर्विकार ठेवून फिरणं आता मला जमतं. पूर्वी मी करत असलेल्या विचारांनी फार गुंगून गेल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर त्रासिक भाव फार पटकन उमटायचे. आता थोडं शहाणपण आलंय. आज रस्त्याने चालताना, ऐन उन्हात त्या पिवळ्या फुलांनी बहरलेल्या झाडांनी फार आत्मिक समाधान आणि शांतता दिली माझ्या विचलित चित्ताला. गेल्या कित्येक दिवसांपासून सारखं माझी फार घालमेल होतेय, सतत अजून न घडणाऱ्या गोष्टींनी मला फार चिंतातूर केलंय. कोणाशी ब...
"Some of the sweetest things in life are through greatest struggling battles"