Skip to main content

Posts

Showing posts with the label जगणं

जगण्याचा लढा

आज आमच्याकडे चार दिवस पाणी नसल्याकारणाने पाण्याची भीषण दाहकता प्रत्यक्षात फर्स्ट hand अनुभव करतोय. इतके दिवस मराठवाड्याला पाणी नाही, शेतकरी कुटुंबांची हतबलता फक्त पेपर मध्ये, बातम्यांमधून वाचत, ऐकत होतो. आज तीच परिस्थिती आम्हा शहरी भागात राहणाऱ्या लोकांवर आल्यामुळे खरं जगण्यातली विवशता आज आम्हाला कळतेय. आपण शहरी लोक फारच लाडावलेलो आहोत. जगण्याच्या सगळ्या सुविधा अक्षरश: लोटांगण घालतात आपल्यासमोर म्हणून अर्थातच आपल्याला किंमत नाही कसलीच. ह्याच जीवनोपयोगी गोष्टींसाठी जेव्हा जबर लढा द्यावा लागतो ना, तेव्हा त्यातली भयाण अस्वस्थता समोर येते. आज पिण्यासाठी देखील पाणी नाही म्हणून जेव्हा दुकानातून काही लिटर्स मध्ये पाणी विकत आणायला लागलं तेव्हा अर्धा ग्लास पाणी पिऊन ते फेकून टाकणाऱ्या असंख्य लोकांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोरून तरळून गेले. आपण सगळेच बेफिकीरीने वागतो. किंबहुना आपल्या वागण्याचं समर्थन आपल्याला द्यावं लागत नाही एखाद्या एजन्सीला किंवा पर्यावरण watch संस्थेला म्हणून पण हा स्वभाव झाला. यात चुकीचं काहीच नाही हीच आपली मानसिकता. माझ्या थोड्याशा पाण्याच्या अपव्ययामुळे कुठे एव...