कॅशिअस क्ले अर्थात मुहम्मद अली.
लहान असतांना वडिलांनी ज्या व्यक्तींबद्दल अगदी भरभरून मला कहाण्या ऐकवल्या त्यात मुहम्मद अली फार वरच्या क्रमांकावर. वर्णभेद चळवळ आणि संघर्षाबद्दल मला खूप लहानपणीच वडिलांकडून बरंच काही ऐकायला मिळालं. जातिव्यवस्थेबद्दल जसं तसंच नेल्सन मंडेला तथा माल्कम एक्स यांच्याबद्दल, त्यांनी सुरु केलेल्या चळवळी, त्यांचा मानवी समानतेसाठी प्रदीर्घ लढा, सारं काही खूप लहान वयापासूनच ऐकत आले वडिलांकडून.
काल मुहम्मद अली यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यावर वाटलं आपण ह्या सर्व जगज्जेत्यांना अमर समजत रहातो. त्यांची कीर्ती अजरामर असतेच पण ते स्वतः देखील, अशी भावना कुठेतरी खोल दडलेली असते आपल्यात. मला आठवतं जेव्हा मुहम्मद अलींच्या मुलीने, लैला अली हिने जागतिक मुष्टीयोद्धा स्पर्धा जिंकली होती, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया एक अत्यंत अभिमानी वडील या भूमिकेतून टीव्ही वर मी ऐकली होती. ते बघून आपण सुद्धा आपल्या वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करून दाखवण्याचा उत्साह माझ्यात संचारला होता. ते चेहऱ्यावरून मला कधीच एक मुष्टीयोद्धा वाटले नाहीत. एखाद्या मुष्टीयोद्ध्याची रागीट मुद्रा किंवा ते स्पर्धात्मक भाव मला कधीच त्यांच्या चेहऱ्यावर जाणवले नाहीत. एखादा शांत, मितभाषी, मृदू स्वभावाचा माणूस अभिप्रेत व्हायचा त्यांच्या देहबोलीतून. नुसतं एक खेळाडू म्हणून नाही तर एक माणूस म्हणून ज्याला राजकीय आणि सामाजिक भान पुरेपूर होतं आणि आपली मतं मांडण्यास जो कधीही कचरला नाही, असा माणूस सगळ्यांवर प्रभाव टाकतोच आणि अलींनी तो सगळ्या जगावर टाकला. कृष्णवर्णीय म्हणून जी हिडीसफिडीस त्यांच्या वाट्याला आली त्याला न विसरता विएत्नाम सारख्या गरीब देशावर युद्ध पुकारलेल्या अमेरिकी सरकारला त्यांनी खडसावून युद्धात सामील होण्यास नकार दिला आणि त्याबद्दल झालेली तीन वर्षांची मुष्टियुद्ध स्पर्धांमधून खेळण्याची बंदी देखील स्वीकारली. असा अवलिया निराळाच. आपल्या मतांवर ठाम राहून अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद त्यांच्यात होती. त्यांचा एक मोहम्मद रफी यांच्यासोबतचा फोटो खूप गाजला. एवढी विनयशीलता आणि नम्रता अंगी बाळगून त्यांनी मुष्टीयोद्धा म्हणून कारकीर्द घडवली हे फार संस्मरणीय आहे. शिवाय सगळ्यांसाठी प्रेरणादायी देखील.
माझ्या लहानपणीच्या आठवणींमधून मला फार प्रेरित करणारे व सतत अन्यायाविरुद्ध लढण्यास बळ देणाऱ्या ह्या महान योद्ध्यास मानाचा सलाम. या सम हाच!

Comments
Post a Comment