काल संध्याकाळी 'अक्षरसंध्या' नामक एका वाचक-लेखक यांच्यामधील संवादासाठी बदलापूरमध्ये सुरु झालेल्या नवीन उपक्रमास उपस्थित राहण्याची संधी मिळाली. रमेश अढांगळे ह्या ऐंशी वर्षीय उर्दू अभ्यासकाचे दहा खंडात लिहिलेल्या उर्दू गझलांचे लिप्यंकरण असलेल्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. श्री. अढांगळे यांनी सुमारे सहा हजार गझलांचा संग्रह गेली चाळीस वर्ष अव्याहतपणे केला आहे. ग्रंथसखा वाचनालयाचे श्री. श्याम जोशी सर यांची मुलाखत ऐकण्याचा योग देखील आला. वाचन आणि पुस्तकप्रेम याला लागलेली घरघर हा सर्वसाधारणपणे संवादाचा भाग जरी असला तरी यानिमित्ताने तरुण आणि ज्येष्ठ वाचक यांची नाळ जोडण्याचा एक स्तुत्य उपक्रम याठिकाणी बघण्यास मिळाला. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी एक वाचक-लेखक कट्टा 'काका गोळे फाउंडेशन' यांच्याकडे असलेल्या 'खुल्या मंचावर' घेण्यात येईल. येत्या १९ जुलै रोजी, 'नरहर अंबादास कुरुंदकर यांचे साहित्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय?' या विषयावर संध्याकाळी सहा वाजता हि चर्चा होणार आहे.
बदलापूर मध्ये राहणाऱ्या सर्व वाचकांनी एकदा नक्की ह्या उपक्रमास हजेरी लावावी.
Comments
Post a Comment