आजच्या दिवसाचे विचारधन ते हे की आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आपण इतरांना कमी लेखता कामा नये! आज, २७ फेब्रुवारी! कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. साधारण बारा वर्षांची असताना मी कुसुमाग्रजांची "कणा" ही कविता श्री. विहंग नायक यांनी सादर केलेल्या एका कार्यक्रमात ऐकली होती. त्यांच्या धीरगंभीर आवाजाची स्मृती आजही माझ्या अंगावर शहारे आणतो. त्यांच्या कवितांचे जसजसे मी पारायण करायला लागले तसे त्यातले भाव, छटा, काव्यात्मकता अजून उमजून स्वत: कविता व्यक्त करायला लागले. पुढे काही वर्षांनी वाचलेल्या "प्रेम कर भिल्लासारखं" आणि "समिधाच सख्या ह्या" अशा कविता तसेच गाण्यांच्या स्वरूपात त्यांचा आस्वाद घेता येणाऱ्या कविता भरपूर वाचल्या. नाशिकमध्ये असलेल्या त्यांच्या स्मरणार्थ उभारलेल्या "कुसुमाग्रज प्रतिष्ठान" ला भेटण्याचा योग आला. आयुष्यात घडणाऱ्या तर्हतर्हेच्या घटनांचा मागोवा घेताना मी हमखास कवितेच्या माध्यमातून त्या व्यक्त करते. एखाद्या लेखकाने इतक्या अचूकपणे माझ्या विचारांना लेखणीतून मांडलेले जेव्हा वाचते तेव्हा ह्या वैश्विकतेचे मला नवल वाटते. भावनांचे शब्दांतून
"Some of the sweetest things in life are through greatest struggling battles"