हळूहळू मनावरचा ताण सैल झाला. उन्हात बसले, हसले, काही जुन्या गोष्टी आठवल्या. क्षणात सकाळपासून दाटून आलेलं मळभ दूर झालं. आधी छातीत धडधडलं, हात थरथरले, मग काहीतरी माझ्या आत निवळलं. आपल्या मनाला सतत एखाद्या टॉनिकची गरज असते. ते टॉनिक मी बऱ्याच दिवसांत प्यायले नव्हते म्हणून हा सगळा उहापोह. शब्दांमध्ये काय विलक्षण सामर्थ्य असतं! माझ्या मनाला उभारी देणारे, त्याला मोकळं करणाऱ्या मैत्रिणी भेटल्या. क्षणात किती बदल झाले. माझ्या खांद्यांवर एक अनामिक ओझं मी वाहत होते, ते हलकं होत गेलं. आपला आनंद, मनःशांती आपण स्वतः शोधावी लागते. विनाकारण विचारांचं ओझं आपण घेऊन फिरत राहतो. ऊन जसजसं वाढत गेलं, तसे मनातले दुःख वितळत गेले. आपल्या अवतीभवती किती सुंदर जग आहे. आपण सगळं विसरून केवळ स्वतः मध्ये रममाण होत जातो आणि मग त्या सातत्याचा देखील कंटाळा येत राहतो. नवीन काहीतरी करण्याची उर्मी विरून जाते. जसा आनंद शोधता यायला हवा, तशीच स्वयं- प्रेरणा देखील आपण जागृत करायला हवी. फार गुरफुटून गेलोय आपण एकाच ध्यासाच्या मागे. सगळे करतात, पूर्ण जग तसंच चाललंय म्हणून त्यांच्यासारखे होण्याचा आणि करण्याचा अट्टहास आत...
"Some of the sweetest things in life are through greatest struggling battles"